गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सांगण्यात आले की, अजित पवार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत सकारात्मक होते. यादरम्यानच आता मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सुत्रे सुनेत्रा पवार यांनी आपल्या हाती घेतली. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू होती असा खुलासा शरद पवार यांच्याकडून करण्यात आला होता. रोहित पवार देखील याबाबत अनेकदा बोलताना दिसले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांकडून अशी कोणतीही चर्चा सुरू नव्हती, असे स्पष्ट केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत सतत चर्चा पुढे येते. मात्र, यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काहीच भाष्य केले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सातत्याने दोन्ही पक्षाच्या विलीनीकरणाबाबत भाष्य केले जाते. यादरम्यानच आता मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. यासंदर्भातील एक गुप्त बैठकही पार पडली.