अंबड (जि. जालना) : उन्हाच्या कडाक्याबरोबरच ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. अनेक गावांत पाणीबाणी सुरू आहे. नांदीमध्ये तर ५० रुपयांना एक ड्रमभर पाणी विकत मिळत (Jalna rural water crisis news) आहे. चांभारवाडी दुधना नदीच्या काठावर आहे. पण, वाळू उपसा झाल्यामुळे येथील ग्रामस्थांनाही टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. गावातील लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वांनाच डोक्यावर हंडा, घागर, कळशी घेऊन मिळेल तेथून पाणी आणावे लागत आहे.

 

गाव दुधना नदीच्या काठावर वसलेले असून कडक उन्हाळ्यात व ऐन पावसाळ्याच्या तोंडावर ग्रामस्थ पुरते तहानलेले आहेत. दुधना नदीपात्रातून दिवसरात्र अवैधरीत्या वाळूचा उपसा करण्यात आला. यामुळे पात्रात मोठमोठे खड्डे पडले.