Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Qualifier 1 IPL 2026 Update : आयपीएल 2026 च्या थरारात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने इतिहास रचत फायनलमध्ये धडक मारली आहे. धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या क्वालिफायर 1 च्या हाय-व्होल्टेज सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा (GT) 92 धावांनी धुव्वा उडवला. या दणदणीत विजयामुळे आरसीबीचा संघ यंदाच्या हंगामातील फायनलचे तिकीट मिळवणारा पहिला संघ ठरला आहे.
That's how you 𝗣𝗟𝗔𝗬 𝗕𝗢𝗟𝗗! ❤️
आरसीबीचा धावांचा डोंगर
सामन्याची सुरुवात गुजरात टायटन्सच्या बाजूने झाली. गुजरातने नाणेफेक (Toss) जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मात्र, आरसीबीच्या फलंदाजांनी हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला. सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत आरसीबीने निर्धारित 20 षटकांत 5 बाद तब्बल 254 धावांचा डोंगर उभा केला. कोहलीने 25 चेंडूत 43 धावा (5 चौकार, 1 षटकार) तर पडिक्कलने 19 चेंडूत 30 धावा केल्या. या डावाचा खरा हिरो ठरला तो कर्णधार रजत पाटीदार. पाटीदारने अवघ्या 33 चेंडूंमध्ये नाबाद 93 धावांची स्फोटक खेळी खेळली, ज्यात 5 चौकार आणि तब्बल 9 गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. त्याला कृणाल पांड्याने (28 चेंडूत 43 धावा) उत्तम साथ दिली.


