Sai Sudharsan Gets Hit-Wicket Out RCB vs GT Qualifier 1 IPL 2026 : आयपीएल 2026 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्स (GT) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात एक अतिशय थरारक आणि अजब घटना पाहायला मिळाली. धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात गुजरातचा फलंदाज साई सुदर्शन आयपीएल इतिहासातील सर्वात विचित्र पद्धतीने बाद (Hit Wicket) झाला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

साई सुदर्शनसोबत नेमकं काय घडलं? (Sai Sudharsan Gets Hit-Wicket Out)

बंगळुरूने दिलेल्या 255 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात खराब झाली होती. दरम्यान, आरसीबीचा गोलंदाज जेकब डफी याच्या एका चेंडूवर साई सुदर्शनने एक अप्रतिम शॉट खेळला, पण त्याचे नशीब इतके खराब होते की तो विचित्र पद्धतीने बाद झाला.