पुणे

पेट्रोल-डिझेलनंतर CNG महाग, आजपासून नवी दरवाढ लागू; पुणे, नाशिक, नागपूरमध्ये किती दर?

Nashik CNG new price, पेट्रोल-डिझेलचे दर आतापर्यंत चार वेळा वाढवण्यात आलेत. तर सीएनजीच्या दरातही वाढ झालीय. पुण्यासह नाशिकमध्ये आजपासून सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

 

CNG Price HikeSakal

सूरज यादव

 

 

Updated on: 

28 May 2026, 8:33 am IST

  •  

मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे देशातील इंधन तेल आणि सीएनजी गॅसच्या दरात गेल्या दोन आठवड्यांपासून वाढ होत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर आतापर्यंत चार वेळा वाढवण्यात आलेत. तर सीएनजीच्या दरातही वाढ झालीय. पुण्यासह नाशिकमध्ये आजपासून सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. नवे दर आजपासून लागू झाले आहेत. पुण्यात २.५० रुपये प्रती किलो तर नाशिकमध्ये १ रुपये ३५ पैसे प्रती किलो इतकी वाढ झालीय.

 

नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात मध्यरात्रीपासून नवी दरवाढ लागू झालीय. CNG च्या दरात १ रुपया ३५ पैशांची वाढ करण्यात आल्यानंतर नाशिकमध्ये आता CNG चा दर ९६ रुपये ५० पैसे प्रति किलो इतका झाला आहे.

पुण्यातील वाहनचालकांना महागाईचा आणखी एक दणका बसला असून, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) 'सीएनजी'च्या दरात प्रतिकिलोमागे २ रुपये ५० पैशांची वाढ केली. त्यामुळे सीएनजीचा नवा दर आता ९४ रुपये ७५ पैसे प्रतिकिलो इतका झाला आहे. हे दर बुधवारी (ता. २७) मध्यरात्रीपासून लागू होतील. पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या चाकण, तळेगाव तसेच हिंजवडी या परिसरासाठी ही दरवाढ लागू असेल. नैसर्गिक वायूच्या (नॅचरल गॅस) खरेदी दरात वाढ झाल्याने वाढ करणे आवश्यक झाल्याचे 'एमएनजीएल'ने स्पष्ट के